जळगाव, 10 जानेवारी : दहावी आणि बारावी पास झालेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिक येथील तोफखाना केंद्रात विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख ही 20 जानेवारी 2023 आहे.
या पदांसाठी होणार भरती?
- लोअर डिव्हिजन क्लर्क
- एमटीएस सफाईवाला
- एमटीएस लास्कर
लोअर डिव्हिजन क्लर्क –
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पास आणि आणि टायपिंगचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
एमटीएस सफाईवाला –
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
एमटीएस लास्कर –
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, पिनकोड – 422102.
ही कागदपत्रं आवश्यक –
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : याठिकाणी क्लिक करा.
देवळाली तोफखान्याबद्दल माहिती –
देवळाली तोफखाना हे नाशिक शहरातील नाशिक रोड या ठिकाणी आहे. तसेच या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्ड देखील आहे. तसेच या ठिकाणी रणगाडे/ तोफखाना संग्रहणालय आहे. आशिया खंडातील हे सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. सदरचे तोफखाना केंद्र सन 1947 मध्ये पाकिस्तानमधून नाशिक येथे स्थलांतरीत झालेले आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकारी तसेच जवानांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तसेच बोफोर्स तोफांचे देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.