जळगाव, 13 फेब्रुवारी : येत्या शनिवारी जळगावात भाजपची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या शनिवारी 15 फेब्रवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
असा असेल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा –
शनिवार, दिनांक 15 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 09.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. सकाळी 09.50 वाजता मोटारीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.10 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे आगमन. सकाळी 10.15 वाजता राखीव. स्थळ – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव. यानंतर दुपारी 1.30 वाजता, विमानाने जळगावहून नाशिककडे प्रयाण.
जळगावात भाजपची बैठक –
येत्या शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीत सदस्यता नोंदणीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, जयकुमार रावल आदी. ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या ‘संघटन पर्व’ मोहिमेचा भाग म्हणून, प्रदेश भाजप अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे १३ फेब्रुवारीपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी जारी केलेल्या अधिकृत माध्यम निवेदनानुसार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या प्रवासात त्यांच्यासोबत असतील आणि राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.