इसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 4 नोव्हेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत घेण्यात आलेल्या एकलव्य प्रकल्पस्तरीय क्रीडा महोत्सव 2023 (सत्रासेन) क्रीडा स्पर्धेत सातगाव डोंगरी आश्रमशाळेतील खेळाडूंनी विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळविले. यानंतर आता शाळेतील विजयी खेळाडूंची नाशिक विभागीय स्तरावर यशस्वी निवड झाली आहे.
स्पर्धेत विजयी खेळाडूंना आदिवासी विकास विभाग नाशिक येथील अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथील प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव येथील राजेंद्र नाईक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल येथील पवन पाटील, विस्तार अधिकारी चाळीसगाव येथील एल. एम. पाटील यांनी करंडक आणि पदक देऊन सन्मानित केले.
खेळाडूंचे पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, स्थानिक शालेय समिती चेअरमन प्रा. भागवत महालपुरे, प्रा. मुख्याध्यापक आर. बी. पवार सर, मा. मुख्याध्यापक यु. एस. मनगटे, यांनी विशेष कौतुक केले. क्रीडा शिक्षक म्हणून आकाश महालपुरे, अक्षय भालेराव, सरला परदेशी मॅडम, ओ. डी. शेंडे यांनी मार्गदर्शन केले.
विजयी खेळाडूंचे निकाल पुढीलप्रमाणे –
1) रविता अक्करसिंग पावरा – लांबउडी प्रथम
2) प्रदीप रेमा बारेला – लांबउडी प्रथम
3) पवन सर्किलाल पावरा – लांबउडी द्वितीय
4) दिनेश मुरल्या पावरा – गोळाफेक द्वितीय
14 वर्षाआतील व्हॉलिबॉल संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला असून सर्व खेळाडुंची नाशिक विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.