संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 3 जुलै : ज्ञानदीप बहुउद्देशीय विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय सार्वे बाभळे शाळेचे इयत्ता 5 वी चे 5 विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या कडून घेण्यात येणार शिष्यवृत्ती परीक्षेच काल अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आणि त्यात शाळेचं 5 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण इयत्ता 5 वी चे 8 विद्यार्थी प्रविष्ट होते आणि 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.
- गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
- चैताली अशोक माळी ( 60% )
- गौरव भाऊसाहेब माळी ( 67%)
- कृष्णा हिरालाल मरसाळे(58%)
- भाविका सदानंद माळी (61 %)
- ज्ञानेश्वरी किशोर माळी ( 60%) हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
दरम्यान, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पवार, म्हसवे शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशमुख, मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पवार यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक आर.पी. साळुंखे, सचिन पाटील, बाळासाहेब निकुंभ, कविता सोनवणे, हरीश पाटील, मोनाली पाटील ,शालिनी पाटील, निलेश पाटील, मनोज श्रीगणेश ,सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा : Accident News : दुचाकीच्या अपघातात तरूणाचा मृत्यू; दोन जखमी, पारोळा तालुक्यातील घटना