नवी दिल्ली – महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा RBI चे 26 वे गव्हर्नर असतील. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या 10 डिसेंबर रोजी संपत आहे. यानंतर संजय मल्होत्रा आता आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची जागा घेतील.
कोण आहेत संजय मल्होत्रा –
संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये आरइसीचे चेअरमन आणि एमडी झाले. याआधी ते ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. 2022 मध्ये, वित्तीय सेवा (DFS) विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांची केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे (RBI) संचालक म्हणून नामनिर्देशन केले.
संजय मल्होत्रा यांचे शिक्षण –
संजय मल्होत्रा हे बुधवारी 11 डिसेंबर रोजी आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून संजय मल्होत्रा यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांचा असेल. संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे 26 वे गव्हर्नर असतील. संजय मल्होत्रा यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तर प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मागील 30 वर्षांपासून मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त, कर, आयटी आणि खाण या खात्यांमध्ये काम केले आहे.
संजय मल्होत्रा दीर्घ अनुभवी –
रिझर्व्ह बँकेचे कामकाज केंद्रीय संचालक मंडळ पाहते आणि अशा परिस्थितीत संजय मल्होत्रा यांना या कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे ते आरबीआयच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहिले. तसेच संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकार या दोन्ही स्तरांवर वित्त आणि कर आकारणीचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांशी संबंधित धोरणे बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते.