जळगाव – विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नेतेमंडळी कार्यकर्ते जोमाने तयारी लागले आहे. यातच आता जळगाव जिल्ह्यात काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झाली. यानंतर आज जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद आणि आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे येत आहेत.
याठिकाणी होणार शरद पवारांची सभा –
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज जळगाव जिल्ह्यात सभा होत आहेत आज सोमवारी ते सकाळी 11 वाजता पारोळा येथे, त्यानंतर दुपारी 4 वाजता जामनेर येथे आणि संध्याकाळी 5 वाजता मुक्ताईनगर व संध्याकाळी 7 वाजता धरणगाव येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले असून ते जनतेला संबोधित करतील. तसेच आज पवार हे जळगावात मुक्कामी राहतील.
उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा –
शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही आज जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे हे सोमवारी दुपारी 12 वाजता चाळीसगाव येथे तर सायंकाळी 7 वाजता चोपडा येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यासाठी ते जळगावला विमानाने येतील आणि हेलिकॉप्टरने चाळीसगावला जातील.
विधानसभा निवडणूक आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराला आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यात प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर काल अमित शहा यांची जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा झाली. तर त्यानंतर आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहेत. एकंदरीतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही रंगात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यात मतदार राजा कुणाला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.