मुंबई, 21 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बारामतीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, बांधकाम विभाग-पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांचा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दशरथ तिवरे फाउंडेशनचे संजय तिवरे, तुकाराम वेखंडे आणि जितेंद्र (पप्पू तरमाळे) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश –
दशरथ तिवरे प्रतिष्ठान (शहापूर), संजय तिवरे, तुकाराम वेखंडे आणि जितेंद्र (पप्पू तरमळे) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी बारामतीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी प्रमोद हिंदुराव, किसनराव तरमळे यांचीही उपस्थिती होती.