मुंबई, 17 मार्च : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्चला होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले असून यामध्ये शिवसनेच्या वाटेला एक जागा आलीय. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचा उमदेवाराचे नाव जाहीर झाले असून नंदुरबारमधील चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या शितल म्हात्रे ह्या नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘एक्स’पोस्ट मुळे नाराज असल्याच्या चर्चा –
शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे ह्या विधान परिषदेसाठी इच्छुक होत्या. शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होऊ शकते अशी देखील चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. मात्र, आज उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर शितल म्हात्रे यांनी ‘एक्स’पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राजकीय जीवनात आणखी संघर्ष करण्याची देखील आपली तयारी असल्याचे संकेतही शीतल म्हात्रे यांनी दिले आहेत
शितल म्हात्रेंच्या ‘एक्स’ पोस्टमध्ये नेमकं काय? –
मंज़िलें अभी और भी हैं
चलना अभी दूर तक और भी है।जो चाह थी मेरी
वो मुझे नहीं मिली,
पर जो कुछ भी मिला
वो किसी स्वपन देखी चाह
से कम भी नहीं…— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 17, 2025
कोण आहेत शितल म्हात्रे? –
शीतल म्हात्रे या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या असून मागील 10 ते 15 वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय आहेत. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर त्या आधी ठाकरे गटात होत्या. दरम्यान, शिवसेना आमदारांच्या बंडानंतर त्या शिंदे गटात सामील झाल्या. शीतल म्हात्रे माजी नगरसेविका असून उत्तर मुंबईच्या दहिसर वॉर्ड नंबर 8 मधून त्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तत्पुर्वी, राजकारणात येण्याआधी त्या पत्रकार म्हणूनही सक्रिय होत्या.
हेही वाचा : Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर