मुंबई, 10 जानेवारी : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत मोठे खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच त्यांच्या कुटुंबियांना निघत असलेल्या मोर्चांमध्ये बीडच्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या? –
संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्या असून बीडच्या गुन्हेगारीबाबत वेगवेगळे खुलासे त्यांनी आतापर्यंत समोर आणले आहेत. अशातच आता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तसेच दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना सीआयडीलाही सवाल करत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली आहे.
“…तर संतोष देशमुख यांचे प्राण कधीच केले नसते” –
बीड जिल्ह्यात खंडणीची जी मागणी होती, ती मे महिन्यापासून होती. खंडणीसाठी एका अधिकार्याचे अपहरण देखील केले गेले होते आणि या सगळ्या गोष्टी एकच आहे. चाटे आणि जे जे माणसे होती त्यांनी फक्त आणि फक्त वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम केले होते. म्हणजे जर मे मध्ये हे प्रकरण इतके गंभीर झाले होते, त्याचे अपहरण देखील केले गेले होते. तर त्यावेळेस जर ही कारवाई झाली असती, तर संतोष देशमुख यांचे प्राण कधीच केले नसते, असे अंजाली दमानिया म्हणाल्या आहेत.
हेही वाचा : Bhusawal Crime News : भर चौकात तरुणावर गोळीबार, भुसावळातील हादरवणारी घटना, नेमकं काय घडलं?