पुणे, 13 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येतील, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेलं.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा निकाल हा 94.10 टक्के इतका लागला असून यामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारलीय. तसेच यंदा कोकण विभाग अव्वल ठरलाय तर नागपुर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी टक्केवारीचा आहे.
- विभागनिहाय निकालाची टक्केवारी –
- कोकण : 99.82 टक्के
- कोल्हापूर : 96.78 टक्के
- मुंबई : 95.84 टक्के
- पुणे : 94.81 टक्के
- नाशिक : 93.04 टक्के
- अमरावती : 92.95 टक्के
- संभाजीनगर : 92.82 टक्के
- लातूर : 92.77 टक्के
- नागपूर : 90.78 टक्के
दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी खालीलप्रमाणे अधिकृत संकेतस्थळवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
1. https://sscresult.mahahsscboard.in
2. https://results.digilocker.gov.in
3. http://sscresult.mkcl.org
4. https://results.navneet.com
5. https://results.targetpublications.org
विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पाहता येणार निकाल? –
mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
‘SSC Exmanation Result 2025’ या लिंकवर करा.
आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
यानंतर, यावर क्लिक करून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हा स्क्रीनवर दिसेल.
तसेच त्या निकालाची पीडीएफ सदर विद्यार्थी डाऊनलोड करू शकतात.