• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

जळगाव, रावेर, नंदूरबारमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस, खान्देशात नेमकी काय आहे परिस्थिती?

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
May 11, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, नंदुरबार
khandesh loksabha election 2024

graphics - suvarna khandesh live news

चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी

जळगाव : खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी होत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज शनिवारी 11 मे रोजी सायंकाळी थंडावणार आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

परवा सोमवारी 13 मे रोजी जळगाव, रावेर आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आज शनिवारी सायंकाळी 6 वाजेनंतर प्रचार बंद होणार आहे. तसेच सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातीही दूर कराव्या लागणार आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने तीनही मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा.

खान्देशातील मतदारसंघानिहाय उमेदवार –

जळगाव लोकसभा मतदारसंघ – जळगाव लोकसभा मतदारसंघात थेट शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये काट्याची लढत होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला असून याठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण-पवार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत भाजप नेत्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. उन्मेश पाटील यांचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मुंबई येथे शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला. तर करण पवार यांनीही उन्मेश पाटील यांच्यासोबत भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बाजूच्या वतीने प्रचंड ताकदीने प्रचार केला जात आहे. अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा मतदारसंघात झाल्या. काल नितीन गडकरी यांचीही जळगावला सभा झाली. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघ – रावेर लोकसभा मतदारसंघात थेट भाजप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये थेट काट्याची लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाला असून याठिकाणी त्यांच्या पक्षाच्या वतीने श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली. तर दुसरीकडे भाजपच्या दोन वेळच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यासोबतच त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ राजकीय नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आणि लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. अद्याप त्यांचा भाजप पक्षप्रवेश सोहळा झालेला नाही. मात्र, त्यांच्या पुन्हा भाजपमध्ये आल्याने रक्षा खडसेंना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे रक्षा खडसे यांच्या नणंद आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या अद्यापही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातच आहेत. मुक्ताईनगरमधून श्रीराम पाटील यांना लीड देण्याची आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूच्या वतीने प्रचंड ताकदीने प्रचार केला जात आहे. तसेच दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ – नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता याठिकाही थेट भाजप आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला असून याठिकाणी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पूत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या वतीने विद्यमान खासदार डॉ. हिना गावीत यांच्यावर केंद्रीय नेतृत्त्वाने पुन्हा विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे डॉ. हिना गावीत आणि महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी अशी ही थेट लढत होणार आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खान्देशातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नंदूरबार येथे सभा घेतली. तर आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदूरबार येथे जाहीर सभा होत आहे. दोन्ही बाजूच्या वतीने प्रचंड ताकदीने प्रचार केला जात आहे. तसेच दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे.
अशा परिस्थितीत महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान परवा 13 मे रोजी मतदार होणार आहे. यामध्ये खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदूरबार या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदार राजा नेमकं कुणाला कौल देतो, हे 4 जून रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: goval padvikaran pawarkhandesh loksabha election 2024khandesh loksabha election campaign last daykhandesh loksabha election candidatesraksha khadseshriram patilsmita wagh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page