रायगड, 12 एप्रिल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. दरम्यान, आज अमित शहा हे रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस देखील त्याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांना करणार अभिवादन –
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अमित शहा आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. यानंतर अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी जेवणालाही जाणार असल्याची माहिती समोर आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार –
गेल्या काही महिन्यांपासून रायगड व नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा हा कायम आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेसेना आग्रही असून याआधी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, कॅबीनेट मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने त्यावेळी स्थगिती देण्यात आली. दरम्यान, आता तरी तो तिढा सुटणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : Breaking! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट; 147 कोटींचा निधी मंजूर