महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली. मात्र, गेल्या तीन दिवसापुर्वी केंद्राने या नार-पार गिरणा प्रकल्पाची मान्यता रद्द केल्याचे बोलले जात होतं. अशातच काल महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या प्रकल्पास मान्यता दिलीय. या पार्श्वभूमीवर आज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेश पाटील यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नार-पार प्रकल्पाला प्रकल्पवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. यासाठी येत्या 16 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्रांताधिकारी कार्यालयांवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.