ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 8 ऑक्टोबर : 2014 मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने देऊन नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते, त्यामुळे आज दहा वर्षांच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केली.
लासगाव येथे “होऊ द्या चर्चा” कार्यक्रम –
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे शनिवार (7 ऑक्टोबर) रोजी “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे गटाचे शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेना जिल्हाउपाधिकारी संदीप जैन, युवा सेना तालुका अधिकारी शशी पाटील यांची उपस्थिती होती.
सरकारवर जोरदार टीका –
सरकारने रोजगार उपलब्ध न केल्याने प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. तसेच सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैराश्य निर्माण झाले आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले व कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप वैशाली सुर्यवंशी यांनी केला.
“होऊ द्या चर्चा” म्हणजे काय? –
शिवसेनेचे खासदार आणि आमदार असलेल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ‘होऊ द्या चर्चा‘ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील गावागावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
गावकऱ्यांसोबत साधला संवाद –
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना ही जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावत लाखो नागरिकांचे प्राण वाचवले तसेच कोरोना महामारीला यशस्वी लढा दिला, असे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊया, असे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गावातील स्थानिक मुद्यांवर गावातील नागरिकांसोबत चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशी पाटील यांनी केले तर संदीप जैन यांनी आभार व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी नरेंद्र सिंग सुर्यवंशी, राजू भैय्या पाटील, मिथुन वाघ, प्रवीण पाटील, योगेश दारकोंडे, कैलास शिवाजी पाटील, रविंद्र रूपसिंग पाटील, विनोद पाटील, हेमराज दिगंबर बाविस्कर, महेश पांडुरंग पाटील, संभाजी पाटील, प्रकाश गोपीचंद पाटील, भागवत पाटील, घनश्याम अभिमान कोळी, पुंडलिक दत्तू पाटील, अभिमान पाटील, भास्कर पाटील, मंगलसिंग पाटील, प्रकाश चंदू पाटील, दीपक नाना पाटील, विकास चौधरी, मुकुंदा पवार, अमरसिंग पाटील, कैलास पाटील, महेंद्रसिंग पाटील, रवी पाटील, सागर पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील, परमेश्वर पाटील, संग्राम पाटील, विशाल पाटील, गुलाब नारायण पाटील, बापू रामदास पाटील, बापू भगवान पाटील, राजू हरी महाजन, संतोष पुना कोळी, अरुण शेख मिस्त्री, अकबर मिस्त्री, आनंदा सीताराम पैठणकर, संदीप दत्तू पाटील, आधार दाभाडे, दीपक नाना भिल, प्रभाकर पाटील, एकनाथ अहिरे पहाण, दत्तू अहिरे, देविदास पाटील, किरण राजपूत, किरण पाटील, अरुण तांबे यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.