सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 1 एप्रिल : पारोळा येथे लाडशाखीय वाणी समाज संस्कृती महिला मंडळातर्फे समाज मंगल कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी निवेदिका योगिता शिरोळे, महिला मंडळ अध्यक्षा प्रा. वर्षा पुरकर, उपाध्यक्षा रुणल कोतकर, दीपिका शेंडे व उषा शेंडे आदी उपस्थित होत्या.
विजया टिपरे व साधना वाणी यांना महिला मंडळाच्या वतीने ‘उंच माझा झोका’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात गीत, नृत्य, नाटिका, गरबा सादर करण्यात आले. याप्रसंगी शैला कोठावदे व शोभा बधान यांनी मत मांडले. सूत्रसंचालन नीता नावरकर, रूपाली शिरोळे यांनी केले. आभार सुनंदा शेंडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सचिव वर्षा कोठावदे, अर्चना मैंद, विद्या येवले, सुनिता भामरे, माधुरी अमृतकर, शीतल टिपरे, योगिता येवले, वृषाली मालपुरे, वंदना शेंडे, ज्योती शिनकर, हेमलता चांदवडे यांनी परिश्रम घेतले.