मुंबई, 8 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरू आहे. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. काल 173 आमदारांनी सदस्यपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज धुळे शहर मतदारसंघाचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी अहिराणी भाषेतून पद व गोपनियतेची शपथ घेतली.
अनुप अग्रवाल यांनी घेतली अहिराणीतून शपथ –
उत्तर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे या जिल्ह्याकडे पाहिले जाते. धुळे जिल्ह्यातील धुळे शहर या विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे यांच्याविरोधात निवडणुकीत विजय मिळवलेल्या अनुप अग्रवाल यांनी आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अहिराणी भाषेतून शपथ घेतली. या शपथविधीचा व्हिडिओ सध्या खान्देशात चर्चेत आहे.
View this post on Instagram
तिरंगी लढतीत मिळवला मोठा विजय –
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार अनिल गोटे यांनी निवडणूक लढवली. तर त्यांच्याविरोधात महायुतीतून भाजपकडून अनुप अग्रवाल यांचे आव्हान होते. तसेच एमआयएमचे विद्यमान आमदार फारूक शाह हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. दरम्यान, भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा दणदणीत विजय झाला.
हेही वाचा : rahul narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा एकदा होणार विधानसभा अध्यक्ष?, थोड्याच वेळात भरणार अर्ज