ईसा तडवी, प्रतिनिधी
वरखेडी (पाचोरा), 14 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वरखेडी येथील 27 वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काल 13 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. आरती समाधान पाटील असे मयत महिलेचे नाव आहे. खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून महिलेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केलीय. दरम्यान, आत्महत्येपुर्वी आरतीने सुसाईड नोट लिहिली त्यात तिला झालेल्या त्रासाबद्दल तिने नमूद करत माझ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी आणि मला न्याय मिळावी, अशी मागणी केलीय.
नेमकी घटना काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी येथील आरती समाधान पाटील ही महिला चाळीसगाव येथे सॅटीन क्रेडिट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनी या खाजगी फायनान्स कंपनीत सहायक व्यवस्थापक (असिस्टन्ट ब्रँच मॅनेजर) या पदावर कार्यरत होती. दरम्यान, याठिकाणी कार्यरत असताना त्यांना कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळत काल बुधवारी 12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी रोजी घरात कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी 13 फेब्रुवारी रोजी सदर महिलेचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आला.
दरम्यान, सदर घटना उघडीस आल्यानंतर वरखेडीच्या पोलीस पाटलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घटनास्थळावरचा पंचनामा करत मयत आरतीचा मृतदेह विहिरीतून काढून उत्तरिय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्यावतीने सुरू आहे.
विवाहितेने आत्महत्येपुर्वी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं? –
आरती पाटील ह्या विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट आढळून आलीय. यामध्ये आरतीने लिहिलंय की, ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या आकाश विजय कुऱ्हेकर (रा. अमरावती) याने माझ्यावर शारीरिक इच्छा पुर्ण करत माझा गैरवापर केला. यानंतर त्याच्यासोबत मी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना माझ्या नवऱ्याने मला पाहिले. दरम्यान, त्यांनी आमच्या कंपनीचे सर्कल हेड प्रिंस कुमार यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर प्रिंस कुमार, कपिल वाडपत्रे आणि आकाश कुऱ्हेकर यांची मला कामावर घेण्यास मनाई असल्याने 27 जानेवारी 2025 रोजी कामावरून काढून टाकले. आकाश कुऱ्हेकर याने माझ्यावर शारीरिक भूक भागवली आणि तरी देखील माझी काहीही चूक नसताना मला कामावरून काढून टाकले. यामुळे माझी कोणतीही चूक नसताना हाकलून देण्याचा दाग मी सहन करू शकत नाही. यामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे सांगत आरतीने आत्महत्या केली.
दरम्यान, सॅटीन क्रेडिट केअर कंपनीचे प्रिंस कुमार (सर्कल हेड, पुणे), कपिल वाडपत्रे (रिजलन मॅनेजर, जालना) आणि आकाश कुऱ्हेकर (रिजनल एच.आर, अमरावती) हे माझे जीवन संपविण्यासाठी जबाबदार असून या तिघांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळावी व माझ्यासह माझ्या परिवाराला न्याय मिळावा, अशी मागणी तिने सुसाईड नोटच्या माध्यमातून केलीय. दरम्यान, आता पोलीस तपासात काय माहिती उघड होते, याकडे लक्ष लागले आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत