नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने हिने बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी ह्या दोघांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर ते दोघेही काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, आज विनेश फोगटने हिने बजरंग पुनियासह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नेमकं काय म्हणाली?
पक्षप्रवेशानंतर विनेश म्हणाली की, काँग्रेसने मला त्यांच्या पक्षात प्रवेश दिला यासाठी मी त्यांची ऋणी आहे. काँग्रेसचे मी धन्यवाद देते आणि मला आज अभिमानास्पद वाटत आहे की, मी अशा एका पक्षात प्रवेश केला आहे, जो पक्ष महिलांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे. जेव्हा आम्हाला रस्त्यावर फरफटत आणि खेचत नेत होते, तेव्हा आम्हाला भाजपा सोडून सगळ्या पक्षांनी साथ दिली. आज मी एका नव्या आयुष्याची सुरुवात करत असून महिलांसाठी आम्ही जो आवाज उठवला होता ती लढाई संपणार नाही आणि ती लढाई सुरु राहणार आहे. दरम्यान, यासाठी आम्ही मागे हटणार नसल्याचेही तिने यावेळी स्पष्ठ केले.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे युट्यूब चॅनल सब्सस्क्राईब करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews
अन् रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा –
कुस्तीपटू विनेश फोगटने काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापुर्वी तिने ट्विटरवर रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. ती त्या ट्विटमध्ये म्हणाली की, भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. दरम्यान, देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन, असेही ती म्हणाली.
हेही वाचा : “राष्ट्रवादीत यायचं असेल तर खडसेंनी…”, जळगावात डॉ. सतीश पाटील नेमकं काय म्हणाले?