मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 18 ऑगस्ट : चोपडा येथील योगिता हरी न्हाळदे यांचा 15 ऑगष्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तहसीलदार भाऊ साहेब थोरात यांच्या हस्ते सन 2023-24 या वर्षीच्या महसूल पंधरवाडा निमित्त आदर्श अव्वल कारकून म्हणुन गौरव करण्यात आला. यावेळी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तहसील कार्यालय चोपडा ध्वजारोहन कार्यक्रम आपटून आयोजित एका कार्यक्रमात हा गौरव सोहळा संपन्न झाला.
अव्वल कारकून म्हणुन गौरव –
संजय गांधी योजना प्रकरणे, इंगायो योजन प्रकरणे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या अंतर्गत विविध लाभार्थ्यांनी यांचे प्रकरणे छाननी, लोकासभा निवडणुकीत टपाली मतदाप्रक्रिया याची कामगिरी अतिशय मी चांगल्या प्रकारे केल्यामुळे योगिता हरी न्हाळदे यांना महसूल पंधरवाडा निमित्त आदर्श अव्वल कारकून म्हणुन गौरवण्यात आले.
त्यावेळी तहसीलदार भाऊ साहेब थोरात, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, सावळे , गटविकास अधिकारी आर ओ वाघ, यांच्या सह महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : पारोळा नगरपालिका वाचनालयाची यशाकडे वाटचाल, स्पर्धा परिक्षेत यशस्वी विद्यार्थांचा झाला सन्मान