सुनील माळी, प्रतिनिधी
पारोळा, 8 जुलै : पारोळा शहरातील भोसले गल्लीतील तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राकेश आबा मराठे (24) असे मृताचे नाव आहे.
काय आहे संपुर्ण बातमी?-
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्यातील पोपटनगर शिवारात राकेशने काल रविवारी विषारी औषध सेवन केले. दरम्यान, ही माहिती नातेवाईकांसह शहरवासीयांना मिळाली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत राकेशला खासगी रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात आणले. मात्र, त्यास डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
राकेशच्या मृत्यूबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारोळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा : Rain Update : राज्यभरात मुसळधार पाऊस, ‘असा’ राहील जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज






