जळगाव, 27 ऑक्टोबर : माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून म्हसावद, बोरनार, लमांजन, वाकडी, सुभाषवाडी, लोणवाडीच्या सुमारे 250 तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला. माजी मंत्री देवकर यांनी पक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अरूण पाटील, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, शुभम सोनवणे, पाथरीचे माजी सरपंच संतोष नेटके, दापोऱ्याचे सरपंच चंद्रकांत काळे, माजी सरपंच गोविंदा तांदळे, गणेश शिंदे व ज्ञानेश्वर वाणी, विकासोचे चेअरमन प्रकाश काळे, ग्रा.पं.सदस्य पप्पू सोनवणे, तुकाराम तांदळे, तुकाराम पाटील, म्हसावदचे ग्रा.पं.सदस्य विवेक चव्हाण, कैलास पाटील, सलीम बागवान, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, शिरसोली येथील गोलू पवार आदी उपस्थित होते.
‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश –
म्हसावद येथील 17 किंग ग्रूप मित्र मंडळाचे नितीन भोई, योगेश सूर्यवंशी, अमोल पाटील, योगेश धनगर, अक्षय कोळी, दीपक महाजन, नवल हटकर, राहुल भोई व सदस्य. वैदू वाड्यातील जय माता दी मित्र मंडळाचे जगदीश शिंदे, दिलीप शिंदे, दुर्गादास वैदू, लक्ष्मण वैदू, अनिल वैदू व सदस्य. खडसे नगरातील जय बजरंग मित्र मंडळाचे रामदास गुंजाळ, दिलीप शिराळे, रोहिदास धोत्रे, युवराज वडर, आकाश शिराळे व सदस्य. पाटील वाड्यातील राजे ग्रूप मंडळाचे गणेश पाटील, कुणाल सोनवणे, दिनेश पाटील, मयूर पाटील, कुणाल पाटील व सदस्य. तसेच राजेंद्र फुलपगारे, धनराज पाटील, युवराज धनगर, उमर पठाण.
बोरनार येथील जय बजरंग मित्र मंडळाचे पवन कोळी, सतीश चौधरी, गौरव चौधरी, यशराज चौधरी व सदस्य. लमांजन येथील ओम साईराम मित्र मंडळाचे राजेंद्र पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील, दशरथ पाटील, विकास पाटील व सदस्य. वाकडीचे गुलाब पाटील, जगदीश पाटील, गजानन साळुंखे, रवींद्र पाटील, रितेश पाटील. सुभाषवाडी येथील अनिल चव्हाण, संदीप राठोड, संतोष राठोड, छोटू चव्हाण, मलखान राठोड. लोणवाडीचे ग्रा.पं. सदस्य संदीप पाटील, अनिल ठाकरे व गजानन पाटील, विलास पाटील, भूषण पाटील.
गुलाबराव देवकर सोमवारी अर्ज दाखल करणार –
जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर हे धरणगाव येथे सोमवारी (ता.28) सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त ऐतिहासिक रॅली काढण्यात येणार असून, त्यात जळगाव व धरणगाव तालुक्यातील आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
हेही वाचा : माजी मंत्री गुलाबराव देवकर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार; धरणगाव शहरात ऐतिहासिक रॅली निघणार