• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग; एकुलती व गोलटेकडी तलावांसाठी ८०.०७ कोटींचा निधी, कार्यारंभ आदेशही जारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

जळगाव, 5 सप्टेंबर: जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, भागपूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत एकूण १,३९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील गोलटेकडी (ता. पाचोरा) लघु पाटबंधारे तलाव आणि एकुलती (ता. जामनेर) साठवण तलावाच्या बांधकामासाठी ८०.०७ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.

भागपूर उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात तापी नदीवरून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी पंपांद्वारे उचलून भागपूर धरणात साठविण्याचे नियोजन आहे. तर दुसऱ्या टप्प्यात भागपूर प्रकल्पातून पाणी उचलून गोलटेकडी लघु पाटबंधारे तलाव आणि एकुलती साठवण तलावात साठविण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये वर्षभर पाणीसाठा उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.

गोलटेकडी लघु पाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ६.०० दशलक्ष घनमीटर असून, त्याद्वारे १,००३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच एकुलती साठवण तलावाची क्षमता १.७५६ दशलक्ष घनमीटर असून, त्यातून ३९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकल्पांमधून एकूण १,३९५ हेक्टर शेतीला सिंचनाचा शाश्वत आधार मिळणार आहे.

दुष्काळी परिस्थिती असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची या दोन्ही प्रकल्पांसाठी दीर्घकाळापासून मागणी होती. पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतीसमोरील अडचणी वाढत होत्या. आता या प्रकल्पांना प्रत्यक्ष गती मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पांचे काम मार्गी लागले आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भागपूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून ते साठवण तलावांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाण्याचा अधिक परिणामकारक वापर होऊन दुष्काळी भागातील शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी, पिकांच्या उत्पादनात वाढ आणि गावागावात समृद्धी आणण्याच्या दिशेने भागपूर उपसा सिंचन योजना महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

– मंत्री गिरीश महाजन

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhagpur lift irrigation schememarathi newssuvarna khandesh liveunder irrigation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

September 4, 2026
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page