पॅरिस, 10 ऑगस्ट : भारताचा 21 वर्षीय युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात प्युटर्टो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझ याला 13-5 अशा फरकाने पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील कुस्ती स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. दरम्यान, अमन सेहरावत भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा हा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय.
अमनने रचला इतिहास –
भारताच्या अमन सेहरावतने प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 ने विजय मिळवत कांस्य पदक पटकावले. दरम्यान, अमने वयाच्या 21 वर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्याने, भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. विशेष म्हणजे भारतीय दलात सामील झालेला अमन हा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता आणि त्याने ऑलिम्पिक पदार्पणात कांस्य पदक जिंकून त्याने मोठा इतिहास रचला आहे. अमनने कांस्यपदक उंचावत ऑलिम्पिकपासूमधील कुस्तीतील पदकाची परंपरा कायम राखली.
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताने आतापर्यंत मिळवलेले पदक –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदक मिळवले आहे. यामध्ये एक रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण सहा पदकांचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेले पदक खालीलप्रमाणे…
- नेमबाजीमध्ये मनू भाकर (10 मीटर एअर रायफल) – कांस्य पदक
- मनू भारत आणि सरबज्योत सिंग (10 मीटर एअर रायफल) – कांस्य पदक
- स्वप्नील कुसळे (50 मीटर रायफल ) – कांस्य पदक
- भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक
- भालाफेकपटू निरज चोप्राने रौप्य पदक
- अमन सेहरावत – कुस्ती – कांस्य पदक
हेही वाचा : बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाची जळगाव जिल्हा बंदची हाक