• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 9, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

जळगाव, 9 फेब्रुवारी : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.

शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील मार्गदर्शनानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा भक्कम पाया आहे. आगामी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय, निर्धास्तपणे व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. माझ्यासह जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे. भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे.”

शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून, ते व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सकारात्मक व सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच त्यांच्या मानसिक तयारीला योग्य दिशा मिळावी, यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

आगामी परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व शिस्त अबाधित राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची शैक्षणिक प्रतिमा अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक व न्याय्य मार्गाने शिक्षण व्यवस्थेला बळ देऊया, असे आवाहन करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patilhsc and ssc examinations 2026jalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page