ईसा तडवी,प्रतिनिधी
भोजे चिंचपुरे (पाचोरा), 29 फेब्रुवारी : अगदी धडधाकट व्यक्तींनाही आयुष्यात खूप अडचणी येत असतात, तर दिव्यांगांच्या समस्या या यापेक्षा खूप भयंकर असतात. अशातच भोजे चिंचपुरे येथील विठ्ठल कांतीलाल कुमावत (वय 46) या निराधार दिव्यांग बांधवाचे लहानपणीच मातृ-पितृ छत्र हरपले. अपंगाना मिळणाऱ्या तीन चाकी सायकलीपासून ते वंचित होते.
जळगाव येथील विनोद (बापू) कुमावत हे त्यांच्या चुलत भावाच्या उत्तरकार्याच्या ठिकाणी आलेले असताना त्यांना विठ्ठल कांतीलाल कुमावत (दीव्यांग) हे भेटले. विठ्ठल कुमावत यांनी विनोद कुमावत यांना त्यांची संपूर्ण हकीकत सांगून 3 चाकी सायकल मिळवून द्या, अशी मागणी केली.
दरम्यान, विनोद बापू कुमावत यांनी या दिव्यांगाची कुठलीही विचारपूस न करता तसेच कुठलेही कागदपत्र त्यांचेकडे नसताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधत सदर हकीकत सांगितली. गिरिश महाजन यांनी देखील लगेच होकार देऊन 3 चाकी सायकल देण्याचे कबूल केले होते.
विठ्ठल कुमावत यांना 28 फेब्रुवारी रोजी 3 चाकी सायकल दिली. यावेळी शांताराम (अण्णा) दगडु बेलदार, विलास रतीलाल कुमावत, यशवंत परसराम कुमावत, नाना सुपडू कुमावत, अजय दिलीप कुमावत, श्रीराम गोबा कुमावत, भूमिका लक्ष्मण कुमावत, सुशीला रविंद्र कुमावत, उषाबाई यशवंत कुमावत, दुर्गा संजय कुमावत, यांची उपस्थिती होती. दरम्यान, विनोद मोतीलाल कुमावत यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
हेही वाचा : आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे अमोल शिंदे व शरद पवार गट समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश






