जम्मू, 9 जुलै : जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा हल्ला चढवला. दरम्यान, या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले तर अन्य पाच जवान जखमी झाले. हे जवान मचेडी या दुर्गम भागात वाहनातून नियमित गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला करत गोळीबार केला. गेल्या पाच दिवसांत दहशतवाद्यांनी दुसऱ्यांदा जवानांवर हल्ला चढवला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरातील कथुआपासून 150 किलोमीटर अंतरावर बडनोटा गावाजवळील मचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर काल दुपारी साडेतीनच्या सुमारास लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा हल्ला दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यामध्ये 4 जवान शहीद झाले तसेच एक जवान उपारादरम्यान शहीद झाला. दरम्यान, या हल्ल्यात एकूण 10 जवान जखमी झाल्याची देखील माहिती समोर आलीय.
जवानांचे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर –
दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्यानंतर जवानांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवादी जवळपासच्या जंगलामध्ये पळून गेले. त्या भागात सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती समोर आलीय. या जवानांच्या मदतीसाठी अन्य सैनिक पाठवण्यात आल्याचे देखील समजते. तसेच हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. हे घनदाट जंगल उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढशी जोडलेले असून त्या भागात पूर्वी अनेक चकमकी झाल्या आहेत.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा