चोपडा, 10 जून : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोपडा- यावल रस्त्यावरील माचला वर्डी फाट्याच्यामध्ये मांस वाहतूक करणारे पिकअप वाहन (एमएच 43 बीबी 0409) पकडले. यामध्ये 800 किलो गुरांचे मांस आढळून आले आहे.
नेमकी बातमी काय? –
चोपडा येथील गोरक्षक संग्राम परदेशी, आकाश भोई, मनु माळी, रोशन चौधरी, भूषण कोळी, पीयूष पाटील, रोहित पाटील आदींनी पिकअप गाडीचा पाठलाग केला. चालकाने नारोद गावच्या शिवारात एका केळीच्या शेतात गाडी उतरून तो चालक फरार झाला. पुढे पोलिसांनी आणि गोरक्षकांनी ती गाडी अडावद पोलिस ठाण्यात जमा केली. गाडीत 800 किलो एवढे गुरांचे मांस सापडले.
सदर गाडी ही चोपडा शहरातून केजीएन कॉलनीतून निघाल्याचे गोरक्षकांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कुलदीपकर, डॉ. सायली गोसावी, डॉ.पंकज सैंदाणे तसेच डॉ. रवि कोळी यांनी मांसचे नमुने घेतले. अडावद पोलिसानीं अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.