सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 17 ऑक्टोबर : पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कार हिचे वरील चालकाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार उलट्या घेतल्याची घटना आज 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. त्यात एक जण जागीच मरण पावला तर दुसरा धुळे येथे नेत असतांना वाटतेतच मरण पावला. तसेच दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच-19-सी एफ-1190 हिचेवर निलेश सुरेश पाटील (वय 25), गोविंद भास्कर राठोड (वय 26), राहुल भाऊसाहेब आहिरे (वय 24 तिघे राहणार तरवाडे तालुका जिल्हा धुळे), महेश आत्माराम देवरे पाटील (वय 24 मोंढाळे प्र. अ. तालुका पारोळा) हे धुळ्याकडे जात असताना पारोळा शहरानजीक असलेल्या विचखेडा गावाच्या अलीकडे कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने कार कार रोडच्या कडेला चार पलट्या खाऊन पाचशे फुटावर थांबली.
दोघांचा जागीच मृत्यू –
दरम्यान, या अपघातात राहुल पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर निलेश पाटील याचा धुळे येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर महेश देवरे, गोविंदा वंजारी हे गंभीरित्या जखमी झाले त्यांना 108 रुग्णावाहिकेत, महामार्गाची रुग्णवाहिका 1033 व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गोविंदा वंजारी हे गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा : आचारसंहिता म्हणजे काय?, ती लागू झाल्यानंतर नेमकं काय बदल होतात?