ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसाठी 14 ऑक्टोबर रोजी साडे तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, त्याच दिवशी दुपारी दोन वाजता पाचोऱ्यातील वारकरी भवनासाठी आणि नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी एकूण 10 करोड रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्यावतीने आमदार किशोर पाटील यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
पाचोरा मतदारसंघात वारकरी संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक किर्तनकार बांधव आहेत. अनेक किर्तनकार तयार होत आहेत. अनेक भजनीमंडळे आहेत. असे असताना कुठल्याही किर्तनकार महाराजाजवळ गेलं तर ते किर्तनकार रात्री अकरा-बारा वाजता उशिराने साधारणतः 50 ते 100 किलोमीटर प्रवास करून ते घरी जात असतात. अशा परिस्थितीत ते हॉटेल वा कुठेही थांबू शकत नाही.
View this post on Instagram
10 करोड रूपयांचा निधी मंजूर –
वारकरी, किर्तनकार महाराज, भजनी मंडळ यांच्या सुविधेसाठी तसेच लहान मुले किर्तनाचे प्रशिक्षण घेऊ इच्छित आहेत. त्यांना ते शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी वारकरी भवन व्हावे अशी मागणी केली जात होती. दरम्यान, या मागणीचा पाठपुरावा करून आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वीच 5 करोड रूपयांचा निधी पाचोऱ्यातील वारकरी भवनासाठी मंजूर झाला. यासोबतच 5 करोड रूपये नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी मंजूर झाले आहेत. असे एकूण 10 करोड रूपये मी मतदारसंघाच्या कामासाठी अगदी निवडणूक जाहीर होण्याच्या दोन तासाआधी आणला असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणुक जाहीर होण्यापर्यंतच्या शेवटच्या मिनिटापर्यंत काम केले असून मी स्वतः अपेक्षित केला नव्हता एवढा निधी मागील दोन-अडीच वर्षात पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या कामांसाठी मंजूर झाला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत