• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये दिवाळी भेट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 14, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये दिवाळी भेट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई, 14 ऑक्टोबर : एसटीच्या 85 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला. तसेच, वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये देण्यासाठी शासनाने 51 कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच 2020-24 दरम्यानच्या वेतन फरकाची वाढीतील रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे 12 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा : Pachora News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर; बांबरूड–कुंरगी गटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindediwali giftmarathi newsMSRTCmsrtc employeessuvarna khandesh live latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page