• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यात ‘या’ नवीन चेहऱ्याला संधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 20, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, रावेर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यात ‘या’ नवीन चेहऱ्याला संधी

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 20 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये आज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारांची पहिला यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून अमोल जावळे यांना भाजपकडून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे.

रावेरमधून अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये रावेर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल जावळे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. असे असताना त्यांचे विरोधकांना कडवे आव्हान असणार आहे.

कोण आहेत अमोल जावळे? –
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर मतदारसंघात भाजपचे काम अमोल जावळे यांनी व्यापक स्वरूपात सुरू ठेवले आहे. असे असताना भाजपने त्यांच्यावर विश्‍वास दाखवून पश्‍चिम जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी अमोल जावळे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, भाजपने अमोल जावळेंच्या ऐवजी खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी घोषित केली.

कार्यकर्त्यांकडून जल्लोष –
अमोल जावळेंना उमेदवारी न मिळाल्याने रावेरसह यावल, चोपडा तालुक्यात जावळे समर्थकांमध्ये असंतोष पसरला. कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत सामूहिकरीत्या आपापल्या पदांचे राजीनामे अमोल जावळे यांच्याकडे दिले होते. दरम्यान, विधानसभेसाठी अमोल जावळेंना भाजपच्या पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर अमोल जावळे यांचे अभिनंदन करण्यात येत असून कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात येत आहे.

रावेर विधानसभा मतदारसंघ –
रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी करत आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते त्यांचे सुपूत्र धनंजय चौधरी हे रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वंचितकडून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात भाजपकडून ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी –
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारांच्या जाहीर केलेल्या पहिल्या यादीत प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा), विनोद शेलार (मालाड पश्चिम), राजेश बकाने (देवळी), श्रीजया चव्हाण (भोकर), शंकर जगताप (चिंचवड), विनोद अग्रवाल (गोंदिया), अनुराधा चव्हाण (फुलंब्री), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), राहुल आवाडे (इचलकरंजी), अमोल जावळे (रावेर) या उमेदवारांना भाजपने नव्याने संधी दिली आहे.

हेही पाहा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol jawalebjp announced first listraver-yaval assembly constituencysuvarna khandesh livevidhan sabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page