• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी बीव्हीजीचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 27, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुंबई, 27 नोव्हेंबर: नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या काळात गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) पुढे सरसावला आहे. बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांच्याकडून मदतीचा धनादेश स्वीकारला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारण आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बीव्हीजीने एक कोटी रुपयांचे योगदान दिले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि संकटांमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक व आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, तसेच कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सीएसआर निधी, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून मदतीचा हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.

बीव्हीजी समूह स्वच्छता, औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, शेती विकास, सेंद्रिय शेती, महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. महाराष्ट्रात समूहाकडून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिका सेवेचे संचालनही केले जाते. गेल्या १२ वर्षांपासून ही सेवा राज्यात अविरतपणे कार्यरत आहे.

सामाजिक बांधिलकी जपत बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वतीने सीएसआरअंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांना आतापर्यंत एकूण एक कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचा समूहाचा प्रयत्न आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: bharat vikas groupchief minister relief fundmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

November 27, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

November 26, 2026
पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

November 26, 2026
जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

November 26, 2026
विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

November 25, 2026
जळगावात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन

जळगावात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन

November 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page