मुंबई : विधानसभेची निवडणुक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तापले आहे. यातच आता महायुतीमध्ये भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या यादीत उमेदवारांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली.
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत 38 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. ही यादी पुढीलप्रमाणे –
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मराव बाबा अत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
महाराष्ट्र विधानसभेचं संपूर्ण वेळापत्रक
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर
- अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
- मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
- मतमोजणी – 23 नोव्हेंबर