ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 ऑक्टोबर : पाचोरा शहरातून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारास आजपासून सुरुवात झाली. सर्वप्रथम त्यांनी आज सकाळी कैलामाता मंदिर तसेच हनुमान मंदिरात दर्शन घेत प्रचाराचे नारळ फोडले. यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास 3 हजार कोटी रूपयांचा निधी विकासासाठी आणला. यामुळे मतदारसंघात अभूतपर्व बदल पाहायला मिळेल. पाचोरा शहरात आणि तालुक्यात शांतता नांदावी आणि शहर तसेच तालुक्यात महाराष्ट्रातून एक बदल घडावा, ही एक अपेक्षा मतदारबांधवांची आहे. आणि त्यांची अपेक्षा सार्थक ठरविण्याचा निर्णय मी घेतला असून पाचोरा शहर आणि तालुक्याचा चेहरा बदलविण्याचे काम मी करणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, माझे मागच्या दहा वर्षांपासून एकच लक्ष होते ते म्हणजे विकास. मी या मतदारसंघात शांतता आणि विकास या दोन ब्रीद वाक्यांना घेऊन चाललोय. आणि यात मला प्रचंड मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे. मागच्या अनेक वर्षांपासूनचा क्राईम दर वाढता राहिला होता. त्यामध्ये अधिकृतरित्या 20 टक्के घट झाल्याचे पाहायला मिळतेय. दरम्यान, मतदारसंघात शांतता प्रस्थापित करण्याचा माझा प्रयत्न करत असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
हेही पाहा : MLA Kishor Appa Interview : तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल