अक्कलकुवा, 15 नोव्हेंबर : अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा (सोराबारा) येथे आदिवासी कर्मचारी मंच, जमाना ऐरिया मार्फत आज 15 नोव्हेंबर रोजी क्रांति सुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्त प्रतिमापुजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी अविनाश वसावे (सरपंच- उमरागव्हाण ग्रा.पं.), नर्मदाबाई अशोक वसावे (उपसरपंच- उमरागव्हाण ग्रा. पं.) बुलाखी वसावे (माजी पोलीस पाटील), हिरालाल वळवी (से.नि. मुख्याध्यापक- आश्रमशाळा), मुंगल्या वळवी (मुख्याध्यापक- जि.प. उमरागव्हाण), जयसिंग वळवी, मोगा वळवी, अॅड. महेश वसावे, पिसा वळवी (अध्यक्ष- बिरसा मुंडा अॅथलेटीक्स क्लब) सुरूपसिंग वसावे, रविंद्र वसावे, इंद्रसिंग वळवी, लोकेश वळवी, ईश्वर वळवी, बिरसा मुंडा अॅथलॅटीक्स क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थीनीं- अमित वसावे, अतुल वसावे, रोहित वळवी, राहुल वळवी, दिपक वळवी, बादल वसावे, रविता वसावे, पल्लवी वळवी, अपुर्वा वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जमाना ऐरियातील अधिकारी-कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांची माहिती –
बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील ‘उलीहातू’ या गावी मुंडा जमातीत झाला. बिरसा मुंडा यांनी अगदी लहान वयातच इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. वयाची पंचविशी सुद्धा गाठली नव्हती तेव्हा त्यांना हा लढा उभारला होता. बिरसा मुंडा हे 1894 साली आदिवासींच्या जमिनी आणि हक्कांसाठी सरदार चळवळीत सामील झाले. दरम्यान, आदिवासी समाजातील लोक बिरसा मुंडा यांना भगवान बिरसा मुंडा हा दर्जा देतात.
हेही वाचा : मित्र झाले कट्टर विरोधक; चाळीसगावमधील लढतीकडे राज्याचे लक्ष, मतदारसंघाचा 1962 पासूनचा ‘असा’ आहे इतिहास