चोपडा, 21 नोव्हेंबर : राज्यात काल 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (उपशिक्षक अनवर्दे -बुधगांव वय -49) हे कर्तव्यावरुन त्यांच्या शिरपुर तालुक्यातील बभळाज येथील मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये त्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला.
काय आहे संपुर्ण बातमी? –
आटोपून घरी परतणारे बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) लक्ष्मीकांत वासुदेव पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे काल रात्री 9 वाजेच्या सुमारास मोटारसायकल अपघातात निधन झाले. बुधवारी रात्री ते चोपडा येथून बभळाज, ता. शिरपूर या मूळ गावी दुचाकीने जात असताना त्यांच्या मोटारसायकलला समोरून आलेल्या दुचाकीने धडक दिली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून त्यांची अंत्ययात्रा 21 रोजी बभळाज येथून निघणार आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या अत्यंत दुर्देवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Update : विधानसभा निवडणूक 2024; जळगाव जिल्ह्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी वाचा एका क्लिकवर