जळगाव, 7 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदरासंघात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. गुलाबराव देवकर हे अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
गुलाबराव देवकर काय म्हणाले? –
विधानसभेच्या पराभवानंतर मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. गेल्या दहा वर्षांपासून विरोधात असताना निवडणुकीतपराभव झाल्याने पुन्हा एकदा पाच वर्ष विरोधात राहावे लागेल. विरोधात असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावागावात अनेक गोष्टींना सामोरे करावा लागतो. त्यामुळे आपण सत्तेत गेले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांच्या बैठकीतून समोर आली होती. यामुळे जळगावचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासोबत संपर्क केला. यानंतर तटकरे यांनी मलाा मुंबईत भेटण्यासाठी बोलवले.
पक्षप्रवेश कधी होणार? –
दरम्यान, सुनिल तटकरे यांना मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, तुमच्या पक्षप्रवेशाबाबत मी अजित दादा तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी देखील माझ्या प्रवेशाला संमती दिली असल्याची माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली. दरम्यान, सोमवारी अजित पवार यांच्या अभिनंदन करण्यासाठी मी देवगिरी बंगल्यावर जाणार असून यावेळी चर्चा करून पक्षप्रवेश कधी होईल हे ठरेल, असल्याचेही देवकर म्हणाले.
हेही वाचा : Breaking News : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास