मुंबई, 16 जानेवारी : राज्य सरकारच्यावतीने मंत्र्यांना नेहमी त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड्स व पोलिसांची सुरक्षा पुरवली जाते. असे असताना महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर त्यांचा बॉडीगार्ड व पोलिसांत राडा झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, या राड्यात मंत्री गुलाबराव मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं? –
गुलाबराव पाटील यांना मुक्तागिरी या बंगल्यावर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील हे काही नेत्यांसह बंगल्याबाहेर पडत असताना या ठिकाणी असलेला बॉडीगार्ड नागरिकांना बाजूला करत होता. अशातच त्या बॉडीगार्डचा तिथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागला.
दरम्यान, बॉडीगार्ड व पोलीस या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्यासमोरच हा संपुर्ण घटनाक्रम पार पडला. यानंतर गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी केल्याने दोघांमधील वादावर पडदा पडला.
हेही वाचा : जळगाव, धुळेसह खान्देशातील ‘या’ आयटीआयला मिळाली ही नावे, नामकरणास राज्य सरकारची मान्यता