जळगाव, 25 जानेवारी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर उत्कृष्ट क्रीडापटू, दिव्यांग खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 26 जानेवारी रोजी क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षी सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून उद्या 26 जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या खेळाडुंचा गौरव होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले.
सदर पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जाहीर करण्यात आले असून, पुरस्कार वितरण समारंभ 26 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात होणार आहे.
सन 2022-23 मधील पुरस्कार विजेते:
गुणवंत पुरुष खेळाडू: स्वप्नील कैलास महाजन (आट्यापाट्या)
गुणवंत महिला खेळाडू: निवेदिका बाळकृष्ण कोळंबे (आट्यापाट्या)
गुणवंत क्रीडा मार्गदर्शिका: सीमा रामचंद्र माळदकर (हँडबॉल)
सन 2023-24 मधील पुरस्कार विजेते:
गुणवंत पुरुष खेळाडू: उदय अनिल महाजन (वेटलिफ्टिंग)
गुणवंत महिला खेळाडू: रोशनी सलीम खान (आट्यापाट्या)
सन 2024-25 मधील पुरस्कार विजेते:
गुणवंत पुरुष खेळाडू: पुष्पक रमेश महाजन (तायक्वान्डो)
गुणवंत महिला खेळाडू: नेहा नितीन देशमुख (सॉफ्टबॉल)
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक: प्रा. डॉ. जयंत भालचंद्र जाधव (सॉफ्टबॉल)
हा उपक्रम क्रीडा संस्कृती वाढवण्यास व नवोदित खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले.
हेही वाचा : VIDEO : खान्देशकन्येनं छत्रपती शिवरायाचं नाव घेत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, नेमकं काय म्हणाली?