जळगाव : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. त्यातच आता जळगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
तालुक्यातील एका गावामध्ये परप्रांतीय 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती राहून तिने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी 30 जानेवारी रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चमासिंग बिलाला (22, रा. भादली खुर्द, ता. जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मध्य प्रदेशातील एक कुटुंब तालुक्यातील एका गावात कामानिमित्त आले आहे. या कुटुंबातील 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चमासिंग याने मागील 2 वर्षांपासून अत्याचार केला. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला.
याप्रकरणी पीडित मुलीने नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन चमासिंग बिलाला याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.
हेही वाचा – Pachora News : पाचोऱ्यातील ‘त्या’ 3500 अतिक्रमित घरांची नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कार्यवाही सुरू