• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क; पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 7, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क; पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक

जळगाव, 7 फेब्रुवारी : जळगाव-इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी जिल्हाभरात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे आदेशावरून कॉपीमुक्त अभियानासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सह प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सतर्क –
जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित मुख्याध्यापक यांना सूचना देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या सूचनांची काटेखोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. दहावी व बारावीच्या परीक्षा भयमुक्त व आनंददायी वातावरणात होतील याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या.

जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक
जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक

500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहतील –
परीक्षा दरम्यान 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहतील याबाबत काळजी घ्यावी. नियमांची उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारांना सह आरोपी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले. परीक्षा केंद्राच्या आतील जबाबदारी हे केंद्र संचालकांचे असेल तर बाहेर होणारे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी पोलीस दलाची असेल याबाबत देखील सूचित करण्यात आले.

भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश –
परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी, सर्व केंद्र संचालक विद्यार्थी व पर्यवेक्षक यांना ओळखपत्र सक्तीचे करावे परीक्षेदरम्यान नियमांची उल्लंघन करणे तसेच गैरप्रकार करणे या बाबी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी सर्वांनी परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडण्यास पोलीस दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी उपस्थित मुख्याध्यापक व केंद्र संचालकांना संबंधित करताना सर्व केंद्र संचालकांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची गंभीरता लक्षात घेऊन या कामकाजात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्व केंद्र संचालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी पूर्वतयारी करून परीक्षा केंद्राचा अहवाल सादर करावा भरारी पथक स्वतंत्रपणे कार्यान्वित करावे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पावले उचलले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी दिलेल्या पत्राबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.दहावी-बारावीच्या परिक्षेचे आयोजन –
यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 57 हजार 487 तसेच बारावीच्या परीक्षेसाठी 47 हजार 667 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदरील परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार असून दहावीसाठी 145 तर 12 वी करिता 81 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

हेही पाहा : 

बातमी शेअर करा !
Share
Tags: copy-free campaigncopy-free campaign in jalgaonmarathi newsstate board examsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | “….कानाखाली मारेन अन् बडतर्फ करेन!” मंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या, व्हिडिओ व्हायरल

Video | “….कानाखाली मारेन अन् बडतर्फ करेन!” मंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या, व्हिडिओ व्हायरल

August 3, 2025
आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून रावेरमध्ये केळी तंत्रज्ञान केंद्र स्थापनेसाठी तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक

आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून रावेरमध्ये केळी तंत्रज्ञान केंद्र स्थापनेसाठी तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक

August 3, 2025
उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली पहिली बुकिंग

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली पहिली बुकिंग

August 3, 2025
किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20 वा हप्ता वितरित; केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जळगावात पीएम किसान उत्सव दिवस उत्साहात संपन्न

किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20 वा हप्ता वितरित; केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जळगावात पीएम किसान उत्सव दिवस उत्साहात संपन्न

August 3, 2025
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे 38 वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे  उद्घाटन

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे 38 वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे  उद्घाटन

August 3, 2025
Revenue Day celebrated in Pachora, joint program of Bhadgaon-Pachora Tehsil, presence of many dignitaries

पाचोऱ्यात महसूल दिन साजरा, भडगाव-पाचोरा तहसिलचा संयुक्त कार्यक्रम, अनेक मान्यवरांची उपस्थिती

August 2, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page