ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 12 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे परंपेनुसार अखंड किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तन सप्ताहाचे हे 70 वे वर्ष असून आज 13 फेब्रुवारीपासून या किर्तन सप्ताहाची सुरूवात होणार आहे.
किर्तन सप्ताहाचे असे आहे नियोजन –
लासगावात 13 फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा किर्तन सप्ताह पर्यंत चालणार आहे. सकाळी 5 ते 6 काकडा भजन तसेच संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री साडे आठ ते साडे दहा वाजेच्या दरम्यान किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
यासोबतच सप्ताहाच्या निमित्त गावात दिंडी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, लासगावातील विठ्ठल रूखमाई मंदिर परिसरात किर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून या किर्तन सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखतकोणत्या किर्तनकारांचे होणार किर्तन? –
गुरूवार, 13 फेब्रवारी 2025 – हभप सावता महाराज मोहाडीकर
शुक्रवार, 14 फेब्रवारी 2025 – हभप दगाजी महाराज बिल्धीकर
शनिवार, 15 फेब्रवारी 2025 – हभप अंकुश महाराज मनवेलकर
रविवार, 16 फेब्रवारी 2025 – हभप शशिकांत महाराज भवरखेडा
सोमवार, 17 फेब्रवारी 2025 – हभप अरूण महाराज जामठीकर
मंगळवार, 18 फेब्रवारी 2025 -भावेश महाराज सुर्यवंशी विटनेर
बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 – हभप विशाल महाराज देशमुख बोरनारकर
गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025 या दिवशी केकतनिंभोरा येथील हभप राजेंद्र महाराज यांचे काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 दरम्यान होईल.