मुंबई, 15 फेब्रुवारी : महायुती सरकारमधील मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात भेट झाली. दरम्यान, या भेटीवरून धनंजय मुंडे आणि धस यांच्याबाबत विविध चर्चा केल्या जात आहेत. यावर आमदार धस यांनी प्रत्युत्तर देत बावनकुळे यांच्या निवासस्थानी भेट कशी झाली याबाबत स्पष्ठीकरण दिलंय.
आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले? –
आमदार सुरेश धस माध्यमांना बोलताना म्हणाले की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला स्वतः त्यांच्या इथे जेवायला बोलवलं होतं. मी त्याठिकाणी गेलो. मात्र, अचानकपण त्याठिकाणी धनंजय मुंडे आले. आमच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मनभेद नाहीत मतभेद आहेत. आणि ते मतभेद मिटवण्याचे प्रयत्न बावनकुळे साहेबांचे होते.
View this post on Instagram
म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे आणि माझ्यातील वाद मिटताएत का, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलं होतं. मी त्यावेळी स्पष्ठ सांगितलं की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाबाबत मी अजिबात माघार घेणार नाही. मी कुणाचंही ऐकून घेणार नाही. आणि जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी हा लढा सुरूच ठेवणार, असे आमदार सुरेश धस म्हणाले.
आपल्या संस्कृतीनुसार मी त्यांना भेटायला गेलो –
मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी देखील सुरेश धस गेले होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. यावरून त्या दोघांमध्ये समझौता झाला का अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान, सुरेश धस यांनी यावर देखील स्पष्ठीकरण देत सांगितले की, मला धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत अचानक फोन आल्याने मी त्यांच्या घरी गेलो होते. यावेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, असेही सुरेश धस म्हणाले. एखाद्याची तब्येत बरी नसेल त्याला रूग्णालयात दाखल करून पुन्हा घरी आणल्यानंतर त्याच्या आपल्या संस्कृतीनुसार मी त्यांना भेटायला गेलो, असेही सुरेश धस म्हणाले. दरम्यान, ब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? असा सवालही सुरेश धस यांनी केला.
मुंडे-धस भेटीवरून राज्याचे राजकारण पेटले –
मंत्री धनजंय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात भेट झाल्यानंतर सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्यासोबत जुळले का? असा सवाल उपस्थित करत अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, आम्ही जरी 4 तास भेटलो असलो तरी अशापद्धतीची चर्चा कुठेही झाली नसल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. दरम्यान, या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, दरम्यान, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची पारिवारिक भेट झाली. आमच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नसल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ठ केलंय.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत