• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीच मुस्लीम नव्हतं’, मंत्री नितेश राणेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींनी यादीच दिली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
'There was no Muslim in Chhatrapati Shivaji Maharaj's army', Amol Mitkari gave a list on Minister Nitesh Rane's claim

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीच मुस्लीम नव्हतं', मंत्री नितेश राणेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींनी यादीच दिली

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलात कोणीच मुस्लीम नव्हते, असा दावा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री, भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलातील मुस्लीम सरदारांची यादीच दिली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच ‘माननीय मंत्र्यांनी वाचावे असे…’ हे कॅप्शन देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलातील मुस्लीम सरदारांची यादी दिली आहे. यातील नावे पुढीलप्रमाणे –

छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मुस्लीम सरदार –

१) सिद्दी हिलाल : घोडदळातील सेनापती सहाय्यक
२) सिद्दी वाहवाह: घोडदळातील सरदार
३) सिद्दी इब्राहिम : शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
४) नूरखान वेग : स्वराज्याचा पहिला सरनोबत
५) मदारी मेहतर : महाराजांचा विश्वासू सेवक
६) काझी हैदर : महाराजांचा वकिल / सचिव
७) शमाखान : सरदार
८) सिद्दी अंबर वहाब : हवालदार
९) हुसेनखान मियाना लष्करात अधिकारी
१०) रूस्तमेजमान : महाराजांचा खास मित्र
११) दर्यासारंग: आरमाराचा पहिला सुभेदार
१२) इब्राहिमखान : आरमारातील अधिकारी
१३) दौलतखान : आरमार प्रमुख (सुभेदार)
१५) सुलतानखान: आरमाराचा सुभेदार
१६) दाऊतखान : आरमारातील सुभेदार
१७) इब्राहिमखान : तोफखान्याचा प्रमुख
१८) विजापूर व गोवळकोंड्यावरून स्वराज्यात आलेले ७०० पठाण : पायदळ व घोडदळात
१९) घोडदळातील चार पथके मोगली चाकी सोडून स्वराज्यात आली : पायदळ व घोडदळात

छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लीमांचे शत्रू नव्हते. ते शत्रू होते अन्यायाचे, अत्याचारी प्रवृत्तीचे! ज्या ज्या वेळी स्वकीयांनीच शिवाजी महाराजांवर तलवारी उपासल्या, तेव्हा ते वार आपल्या छातीवर झेलणारे वीर मुस्लीमच होते, हा इतिहास नाकारता येणार नाही! छत्रपतींनी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारलेले निधर्मी राज्य निर्माण केले होते. महाराजांचा लढा हा राष्ट्रीयत्वाचा होता!, असे त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही दिली समज –

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापन करताना कधीच जातींमध्ये किंवा समाजात भेद केला नाही. त्यांनी महाराष्ट्रात राहणारा जो मराठा माणूस आहे, त्या सगळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापन केली आहे. अलीकडच्या काळात ‘छावा’ चित्रपट आला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास नव्या पिढीसमोर आणला आहे. मी विधिमंडळातील दोन्ही बाजूच्या सन्मानयीय सदस्यांना सांगेन की, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, असा मुस्लीम समाज मोठ्याप्रमाणावर भारतात आहे. आपण जो इतिहास वाचला आहे, तो संशोधन करुन आणि माहिती गोळा करुन मांडण्यात आला आहे. त्यामध्ये लिहण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मुस्लीम लोक होते. शिवाजी महाराजांचा दारुगोळा कोण सांभाळत होतं? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – किती लाडक्या बहिणींना अपात्र केलं?, 2100 रुपये कधी देणार?, ठाकरेंच्या आमदाराच्या प्रश्नावर मंत्री अदिती तटकरेंनी काय उत्तर दिलं?

हेही वाचा – ‘जळगावातही एक आका, त्याला राजकीय संरक्षण’, एकनाथ खडसेंनी मांडली जिल्ह्यातील गुन्हेगारीची स्थिती, सरकारला केले ‘हे’ सवाल?

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol mitkariChhatrapati Shivaji Maharajmaharashtra politicsnitesh rane

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DCM Eknath Shinde on Shiv Jayanti 2026: शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde on Shiv Jayanti 2026: शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

February 19, 2026
VIDEO: किल्ले शिवनेरीवर शिवजयंती जन्मोत्सव सोहळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलंच भाषण

VIDEO: किल्ले शिवनेरीवर शिवजयंती जन्मोत्सव सोहळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलंच भाषण

February 19, 2026
Video | छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Video | छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 19, 2026
‘लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत; आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय

‘लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत; आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय

February 19, 2026
Ramadan 2026:  भारतामध्ये आजपासून रमजान प्रारंभ, मुस्लिम बांधवांकडून रोजाला सुरुवात

Ramadan 2026:  भारतामध्ये आजपासून रमजान प्रारंभ, मुस्लिम बांधवांकडून रोजाला सुरुवात

February 19, 2026
जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

February 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page