• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Jalgaon Murder : शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाचा खून शेतीच्या वादातून की आणखी कोणत्या कारणातून?, पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 21, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
jalgaon guardian minister gulabrao patil media interaction on Murder of former deputy sarpanch of Shinde camp in Jalgaon

जळगावात शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाचा खून, वाद शेतावरुन की आणखी कोणत्या कारणातून?, पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज सकाळी एक अत्यंत हादरवणारी घटना घडली. शिंदे गटाचे माजी उपसरपंच असलेले युवराज कोळी यांच्या हत्येच्या घटनेनंतर जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मृत युवराज कोळी यांच्या कुटुबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच माध्यमांशी बोलताना या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले पालकमंत्री गुलाबराव पाटील –

माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावच्या कानसवाडा गावाजवळ हा प्रकार घडला. सकाळी 8 वाजता युवराज कोळी हा शेतात जात असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याचा जीव गेलेला आहे. त्याचे शव याठिकाणी आणलेले आहे त्याचा पंचनामा किंवा शवविच्छेदन याठिकाणी केलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांची मागणी आहे. पण आम्ही त्यांना विनंती केली, शवविच्छेदन ही प्रक्रिया पूर्ण करा. आताच एसपींसोबत माझं बोलणं झालं आहे. एलसीबीचं पथक आणि आणखी दोन पोलीस पथक आरोपींच्या शोधात आहे आणि दोन तासात त्यांना अटक होईल. हा वाद शेतावरुन होता की आणखी कोणत्या कारणातून ही हत्या झाली, हे पोलीस तपासातून समोर येणार आहे, असेही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

काय आहे नेमकी घटना –

जळगाव तालुक्यातील कानसवाडे परिसरात ही घटना घडली. युवराज सोपान कोळी (वय-35) असे हत्या झालेल्या माजी उपसंरपचाचे नाव आहे. युवराज कोळी हे कानसवाडे येथे शिंदे गटाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते.आई-वडील, पत्नी आणि मुलांसह ते वास्तव्यास होते. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे.

दरम्यान, गुरूवारी रात्री गावातील काही जणांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्यावर तिघांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. यावेळी युवराज कोळी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना पाहताच आजुबाजुचे ग्रामस्थ धावत आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखार घटनास्थळावरून पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.

भरत पाटील, देवा पाटील, महेश पाटील अशी खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तीन आरोपींना युवराज कोळी यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. त्यापैकी भरत पाटील याला अटक झाली आहे, अशी माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

हेही वाचा – Jalgaon Murder : जळगावात शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाचा खून, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabra patil newsjalgaon crimejalgaon guardian ministerjalgaon murderjalgaon murder newsjalgaon newsjalgaon police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page