ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 मार्च : पाचोरा शहराजवळ असलेल्या असलेल्या सारोळा ते मोंढाळा रस्त्यावरील प्रसिद्ध असलेल्या शनिधाम मंदीराच्या यात्रोत्सवाला आज 26 मार्चपासून मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली आहे. शनिधाम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 26 ते 29 मार्चपर्यंत किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच 29 मार्च रोजी महाआरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
शनिधाम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन –
शनिधाम उत्साहनिमित्त 26 मार्चपासून रोजी ते 29 मार्चपर्यंत सकाळी 11 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत जेवणरुपी प्रसाद दिला जाणार आहे. त्यानंतर रोज रात्री 8 ते 10 किर्तनाचा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये प्रसिद्ध किर्तनकार महाराजांचे किर्तन पार पडणार आहे.
किर्तनाच्या कार्यमाचे नियोजन –
26 मार्च – ह.भ.प. सुरेश महाराज, सार्वेकर
27 मार्च – ह. भ. प.रविकिरण महाराज दोंडाईचाकर
28 मार्च – ह.भ. प . दिनेश महाराज, कंचनपुर
29 मार्च – ह. भ. प.गजानन महाराज वरसाडेकर (सकाळी 9 ते 11)
दरम्यान, 29 मार्च रोजी यात्रोत्सव असणार आहे.
महाआरोग्य शिबिराचे आयोजन –
शनिधाम यात्रोत्सवानिमित्ताने 29 मार्च, शनिवार रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व आरोग्याच्या तपासणी आणि उपचार मोफत होणार आहे. या शिबिराचा आणि किर्तनाचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक भरत महाराज आणि शनिधाम मंदिर विश्वस्त यांनी केले आहे.
हेही वाचा : ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत