आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, असं आपण सर्वच जण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र, या कृषीप्रधान देशामध्ये आजही आपल्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतोय. तर दुसरीकडे अशा परिस्थितीतही काही शेतकरी हे समाजासमोर शेतीच्या माध्यमातून प्रेरणादायी उदाहण ठरतायेत. आणि आपण या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या नेमक्या आहेत.. यासोबतच त्यांनी केलेले यशस्वी प्रयोग आणि त्यांचे अनुभव या सर्व गोष्टींचा फायदा हा इतर शेतकऱ्यांनाही व्हावा आणि शेती ही फक्त लग्नासाठी स्थळ पाहण्याचा विषय नाही तर मानवी जीवनाचा तो एक अविभाज्य घटक आहे, या हेतूने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज’च्या माध्यमातून ‘गोष्ट शेतकऱ्याची’ ही विशेष मालिका सुरू केली जात आहे. या मालिकेतील पहिला भागाचा हा प्रोमो. ही मुलाखत लवकरच उद्या सोमवारी सकाळी 9 सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजवर प्रसारित होईल.