मिलिंद वाणी, प्रतिनिधी
किनगाव/ ममुराबाद (जळगाव), 12 एप्रिल : राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले हे रस्ते केवळ वाहतुकीचे साधन नसून गावाचा आत्मविश्वास वाढवणारे माध्यम आहेत. “रस्ते म्हणजे विकासाची रक्तवाहिनी असून, हे रस्ते स्थानिक जनतेसाठी वरदान ठरणार आहेत. ते विकासाच्या नव्या युगाची नांदी ठरतील.
दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारे रस्ते अत्यंत महत्त्वाचे –
जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारे रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून, हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यांचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे, असा स्पष्ट इशारा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. ते ममुराबाद-विदगाव-किनगाव मार्गावरील काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत मागील वर्षी मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्यात 438 किमीचे काँक्रीट रस्ते मंजूर करण्यात आले असून, यासाठी तब्बल 1961 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आ. लताताई सोनवणे उपस्थित होते.
यावेळी चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, जनतेचे आशीर्वाद कधीही विसरणार नसून गावं तिथे विकास केला जात आहे. या भागांतील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि सामान्य नागरिकांना आता जलद, सुरक्षित आणि सुलभ दळण-वळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन ग्रामीण बाजारपेठांना चालना मिळणार आहे.
10 वर्षांपर्यंत त्याची देखभाल व दुरुस्तीही ठेकेदाराकडूनच केली जाणार –
दर्जेदार रस्त्यामुळे संपूर्ण दळणवळण अधिक गतीमान होईल, पुढील 10 वर्षांपर्यंत त्याची देखभाल व दुरुस्तीही ठेकेदाराकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे मंत्री गुलाबराव पाटील, माजी आ. लताताई सोनवणे, आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी पाठपुरावा केला होता. राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत मागील वर्षी मार्च महिन्यात या भागातील रस्त्यांचे काम मंजुर करण्यात आले होते.
या रस्त्यांचे झाले भूमिपूजन –
यावेळी जळगाव ममुराबाद ते विदगाव ते किनगाव या 24 किमी रस्त्याचे 101 कोटी रुपयांचे भूमिपूजन किनगाव, ममुराबाद येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 101 कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी खर्ची पडणार आहे. या रस्त्याच्या भूमिपूजनामुळे या भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आ. लताताई सोनवणे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. कार्याक्रमचे प्रास्ताविक किरणं पाटील व अजय पाटील यांनी केले. सुत्रंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, नरेंद्र पाटील सभापती मार्केट कमिटी चोपडा सुभाष आप्पा सोळुंके, अविनाश पाटील जिल्हा पिक फेडरेशन संचालक, बबलू कोळी उपसभापती यावल मार्केट सुयऀभान पाटील, उज्जैनसिंग राजपुत, विलास नाना पाटील, कांचनताई फालक, ॲड.शिवराज पाटील, रावसाहेब पाटील, गोपाल पाटील, एम.व्ही पाटील, ए.के. गंभीर, विकास पाटील, कल्पनाताई पाटील, स्वाती बडगुजर, अनिता शिरसाठ, गोटु सोनवणे, गोटु सोळुंके, विनायक पाटील, समाधान सोनवणे, पिंटू कोळी, दिनु अण्णा माळी, माणिक बापु महाजन, राजेंद्र पाटील, कैलास बाविस्कर. चंद्रशेखर पाटील, देविदास पाटील, छोटू भाऊ पाटील, दीपक पाटील गोकुळ भाऊ सोनवणे, दिनु अण्णा माळी, ममुराबाद येथे माजी सभापती जनाआप्पा कोळी, महेश चौधरी, सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच विलास सोनवणे, युवासेनेचे किरण पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील, भरत शिंदे, अशोक गावंडे, राहुल ढाके, शैलेश पाटील, सुनिता चौधरी, आरती पाटील यांच्यासह किनगाव ममराबाद व परिसरातील शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.