ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 एप्रिल : आज पाचोरा येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक-2 तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा बक्षीस वितरण सन 2024-25 सोहळा व्यापारी भवन येथे संपन्न झाला. प्राथमिक शिक्षण विभागातून तालुक्यातील निपाणे तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील पाचोरा येथील गो.से. हायस्कूल ह्या दोघेही शाळेने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बक्षीस विजेत्यांना एक लाख रुपये पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन शाळेचा गौरव करण्यात आला.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शाळेतील शिक्षक-शिक्षिकांचे अभिनंदन करत कौतुक केले. तसेच शिक्षण विभागाने उत्कृष्ट प्रकारे काम करून शिक्षणाचा दर्जा वाढविला आहे तसेच शिक्षकांचा गौरव केला. दरम्यान, तालुका शिक्षण अधिकारी यांनी शिक्षा विभागाकडे अधिक लक्ष द्यावे, असेही आमदार पाटील यांनी सुचविले.
यावेळी पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे, तालुका गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील, अधीक्षक शालेय पोषण आहार पाचोरा सरोज गायकवाड, खलील देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, बांबरूडचे उपसरपंच मनोज वाघ, शिक्षक सेनेचे राजेंद्र पाटील, विजय ठाकूर, तालुक्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हेही वाचा : अखेर ‘त्या’ दोन वर्षीय बालिकेला ठार करणारा बिबट्या जेरबंद; नेमका कसा अडकला सापळ्यात?