नवी दिल्ली, 23 एप्रिल : काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, यामध्ये एका नौदल अधिकाऱ्याचा देखील समावेश होता. लेफ्टनंट विनय नरवाल असे शहीद झालेल्या नौदल अधिकाऱ्याचे नाव असून त्यांचे पार्थिव आज दिल्ली विमानतळावर आणण्यात आले. यानंतर प्रशासनाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी हिमांशी यांचा मन हेलावून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला.
दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी शहीद-
विनय नरवाल हे मूळचे हरियाणा राज्यातील होते. ते सध्या भारतीय नौदलात लेफ्टनंट अधिकारी म्हणून केरळमधील कोची येथे कार्यरत होते. दरम्यान, लग्नानंतर फिरण्यासाठी ते पहलगाममध्ये आले होते. काल, 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशवाद्यांचा भ्याड हल्ल्यात ते शहीद झाले. त्यांचे पार्थिव श्रीनगरहून दिल्ली विमानतळावर आज दुपारी आणण्यात आले. यानंतर हरियाणातील करनालमध्ये त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे.
View this post on Instagram
दिल्ली विमानतळावर पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश –
लेफ्टनंट विनय नरवाल यांचा गेल्या सात दिवसांपुर्वीच अर्थात 16 एप्रिल रोजी गुरूग्राम येथे विवाह सोहळा पार पडला. यानंतर ते आणि त्यांची पत्नी हिमांशी हे काश्मीरमध्ये फिरायला आले होते. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले. दरम्यान, श्रीनगरहून त्यांचं पार्थिव हे दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. दरम्यान, सात दिवसांपुर्वीच लग्न झालेल्या पतीचा अशापद्धतीने मृत्यू झाल्यानं शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश होता.
पहलगाम दहशतवादी हल्ला –
भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान, या दहशतवादी हल्लात 28 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नौदल अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. यासोबत महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय. अक्षरशः दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Breaking : काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला! 28 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील 2 जणांचा समावेश